गोगटे जोगळेकर
महाविद्यालयाच्या मराठी विभागाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतमातेस ‘पत्ररूपी’ अनोखी भेट दिली.
विद्यार्थी वर्ग
आजकाल पत्र लिहिण्यास विसरला असल्याने मराठी विभागाने विद्यार्थ्यांना प्रेरणा देत
पोस्ट कार्ड लिहिण्यास प्रवृत्त केले. ‘आईचे
पत्र हरवलं’, ‘डाकिया डाक लाया’ यासारखे खेळ आणि गाणी कालौघात लुप्त होत
चालल्याने पत्र लेखनाचा संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावा असा हेतू समोर ठेऊन सदर
उपक्रम घेण्यात आला. या पत्र लेखन स्पर्धेत कु. साक्षी पंडित प्रथम, ऋतुराज मराठे द्वितीय, शुभराणी होरंबे तृतीय क्रमांकाचे आणि
ओंकार ओक उत्तेजनार्थ विजेते ठरले. सर्व विजेत्यांना स्वातंत्र्यदिनी झालेल्या
समारंभात प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सर्व पत्रे फलकावर
प्रदर्शित करण्यात आली आणि नंतर शहीद जवान स्मारक, देवरुख,ता. संगमेश्वर येथे
प्रदर्शनास पाठवण्यात आली आहेत. या उपक्रमात अनेक विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने
सहभागी झाले होते. विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, डॉ. निधी पटवर्धन आणि प्रा. सायली पिलणकर यांनी या उपक्रमाकरिता
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment