Tuesday 2 March 2021

 

"साहित्य स्वत:त उगवून येण्याची किमया देते" -  कवी रवींद्र लाखे                                

गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात 'मराठी राजभाषा दिन' उत्साहात संपन्न

 

          गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात दि. २७ फेब्रुवारी हा 'मराठी राजभाषा दिन' मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या दिनाचे औचित्य साधून कवी रवींद्र लाखे यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचे तसेच प्रतिभावंत कवींच्या निवडक कवितांचे चित्र-काव्य प्रदर्शन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आयोजित केले होते.

          महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आयोजित केलेल्या चित्र-काव्य प्रदर्शनाच्या उद्घाटनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्र. प्राचार्य डॉ. पी.पी.कुलकर्णी यांच्या हस्ते तसेच कलाशाखेच्या उपप्राचार्या डॉ.कल्पना आठल्ये, मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे , ग्रंथालयाचे उत्पल वाकडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन मराठी विभागाच्या प्रा.सीमा वीर यांनी केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' हे गीत एम.ए. भाग एकचा विद्यार्थी अमेय पंडीत याने सादर केले. यानंतर तृतीय वर्ष कला शाखेच्या दिप्ती वहाळकर या विद्यार्थिनीने 'माझ्या मराठीचा बोल आहे अंतरात खोल' ही कविता सादर केली.

          'साहित्य जीवनाला काय देते ?'  या विषयावर ऑनलाईन व्याख्यानात सहभागींना मार्गदर्शन करताना कवी रवींद्र लाखे यांनी उपनिषदातील एक ओळ सांगितली,"एकटयानं जीव रमत नाही, दोघे आले की भय वाटते." या ओळीभोवतीच जीवनातलं सर्व साहित्य तयार झाले आहे. विविध प्रकारचे साहित्य वाचल्याने आपल्या जीवनाला दिशा मिळते. साहित्य तुम्हाला स्वत:त उगवून येण्याची किमया देते असे प्रतिपादन केले.

          मराठी विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. चित्र- काव्य प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी प्रातिनिधिक स्वरुपात विद्यार्थी उपस्थित होते. ऑनलाईन व्याख्यानात बहुसंख्य मराठी प्रेमी रसिक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

 गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त  दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...