शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये मराठी विभागाने
द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी लेखन आणि सादरीकरण कौशल्ये हा Add on course राबविला. यामध्ये
सहभागी विद्यार्थ्यांनी नगर वाचनालय आणि
मिती क्रिएशन तर्फे आयोजित ‘श्रावण महोत्सव’ या भव्य पाककला स्पर्धेचे नियोजन केले. या पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळाला. 62 महिला यात सहभागी
झाल्या होत्या.
‘श्रावणमहोत्सव २०१८
महाराष्ट्र दौरा’ या पाककला सोहळयाचं
आयोजन दादर, डोंबिवली, वसई, पनवेल, नेरूळ, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर, चिपळूण आणि पुणे अशा दहा शहरांमध्ये
करण्यात आले होते.
या स्पर्धेची तिसरी प्राथमिक फेरी रत्नागिरी
शहरात रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय यांच्या सहकार्याने दिनांक १९ ऑगस्ट २०१८ रोजी सायं ४ वाजता, रत्नागिरी (जिल्हा)
नगर वाचनालय सभागृहात संपन्न झाली. ‘मक्यापासून बनवलेला एक पदार्थ’ असा स्पर्धेचा विषय होता.
रत्नागिरीतील फेरीत शेफ तुषार प्रीती देशमुख आणि
उत्तरा मोने हे मुख्य परीक्षक होते. रत्नागिरीतील स्वप्ना पटवर्धन आणि सीमा
श्रीखंडे यांनीही परीक्षकाची भूमिका बजावली. या स्पर्धेची निर्मिती गेले पंचवीस
वर्ष इव्हेंट्स आणि मिडिया या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उत्तरा मोने यांच्या
मिती क्रिएशन्सची होती. तसेच श्रावण महोत्सवाच्या रत्नागिरी सेंटरच्या सिटी हेड
म्हणून डॉ. निधी पटवर्धन यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन
केल्याबद्दल आयोजक आणि परीक्षकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
शेफ तुषार प्रीती देशमुख यांच्यासोबत विद्यार्थी |
No comments:
Post a Comment