गोगटे
जोगळेकर महाविद्यालयात मराठी विभागाच्या पत्रकारिता प्रशिक्षुता (इंटर्नशिप)
उपक्रमाचे उद्घाटन
मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच संपन्न
झाले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून दै. तरुण भारतचे मुख्य प्रतिनिधी सुकांत चक्रदेव
उपस्थित होते.
व्यासपीठावर
लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी,
कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे उपस्थित होते. दै. तरुण भारत
यांच्या सहकार्याने सादर उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या
व्यक्तिमत्वाला प्रशिक्षुतेच्या (इंटर्नशिप) माध्यमातून विविध आयाम प्राप्त
व्हावेत, भविष्यात पत्रकारितेच्या माध्यमातून रोजगार संधी
उपलब्ध व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य डॉ.
अरविंद कुलकर्णी आणि उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनीही आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सीमा वीर यांनी केले.
पुढील
सत्रात श्री. सुकांत चक्रदेव यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी
उपक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. उपक्रमाची प्रमुख म्हणून पर्णिका भडसावळे तर
उपप्रमुख म्हणून सोहम
कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
No comments:
Post a Comment