शैक्षणिक
वर्ष २०१८-१९ मध्ये मराठी विभागाने द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी लेखन आणि
सादरीकरण कौशल्ये हा Add on course राबविला.
यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने
आयोजित समूहगीत गायन स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत आशुतोष नाडकर्णी, संकेत पाडळकर, पूर्वा सावंत, रेणुका सरदेसाई, पूर्वा देवस्थळी, काजल चव्हाण या
विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांच्या गायलेल्या वंदे मातरम् या समूह्गीताचे संगीत दिग्दर्शन दीप्ती आगाशे यांनी
केले. तर हार्मोनियम साथ अक्षय पेडणेकर आणि तबला साथ सुश्रुत चितळे याने केली. या
गीताला परीक्षक आणि श्रोते यांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
समूहगीत सादर करताना डावीकडून संकेत पाडळकर, काजल चव्हाण, पूर्वा सावंत, रेणुका सरदेसाई, पूर्वा देवस्थळी, आशुतोष नाडकर्णी |
No comments:
Post a Comment