गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १३ ऑगस्ट २०१८ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने घेण्यात आलेल्या समूहगीत स्पर्धेत मराठी विभागाच्या महदंबा संघाने सहभाग नोंदविला. मराठी विभागाच्या संघात सायली गायकवाड, नूतन निंबरे, हर्षाली निंबरे, प्रियांका तांबे, अंकिता चव्हाण, श्रेया पाध्ये, तृप्ती धुमाळ, अक्षता शिंदे या विद्यार्थिनींचा समावेश होता. 'बलसागर भारत होवो' ही साने गुरुजी यांची रचना विद्यार्थिनींनी सादर केली. या संघातील हर्षाली निंबरे व अक्षता शिंदे या विद्यार्थिनींची विद्यापीठ स्तरावरील कव्वाली गायन स्पर्धेच्या संघाकरिता निवड करण्यात आली.
समूहगीतसादर करताना मराठी विभागाचा संघ |
No comments:
Post a Comment