Wednesday, 5 September 2018
Thursday, 30 August 2018
मूकबधिर विद्यालयात रंगला अनोखा रक्षाबंधन सोहळा
संस्कृतीतील पारंपरिक सणांना नवे परिमाण देणे ही काळाची गरज
आहे. महाविद्यालयात शिकत असताना अभ्यासाच्या बरोबरीनेच हे सामाजिक भानही विद्यार्थ्यांनी
जपले. द्वितीय वर्ष कला शाखेत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनचा सण असाच
काहीसा वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
द्वितीय वर्ष कला शाखेत शिकणाऱ्या मराठी विभागाच्या जागृती
महाडिक, रश्मी नाटेकर, सोहन कांबळे तसेच अन्य विभागातील अमृता नायक, प्रसाद
जांगळे, राज पोलिस या विद्यार्थ्यांनी हा अभिनव उपक्रम केला. या विद्यार्थ्यांनी
स्वेच्छेने स्वतः राख्या तयार करून शहरातील केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर
विद्यालयात रक्षाबंधनाचा सण साजरा केला. केवळ तेथील मुलांना राख्या बांधून हे
विद्यार्थी थांबले नाहीत तर तेथील मुलींनाही राख्या बांधून स्त्री-पुरुष समानतेचे आणि स्त्री-सक्षमीकरणाचे महत्त्व
त्यांनी अधोरेखित केले. मूकबधिर विद्यालयातील सर्वच मुलांनी आणि मुलींनीही या अनोख्या रक्षाबंधन सोहळ्याचा आनंद लुटला. त्यानंतर सर्व मुलांना खाऊचे वाटप करून विद्यार्थ्यांनी या
उपक्रमाचा समारोप केला. विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरेणेतून राबविलेल्या या
उपक्रमाचे अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी विशेष कौतुक
केले.
आशुतोष नाडकर्णीने साकारली मराठी चित्रपटात भूमिका
मराठी विभागाचा विद्यार्थी आशुतोष नाडकर्णी याने १८ मे २०१८
रोजी प्रदर्शित झालेल्या 'वेडं मन तुझ्यासाठी' या मराठी चित्रपटात गौरांग या नायकाच्या
मित्राची भूमिका साकारली. या चित्रपटाची निर्मिती प्रितीश कामत यांनी ड्रीम वे फिल्म
कंपनी या संस्थेंतर्गत केली होती. या चित्रपटात अनुराग वरळीकर, कोमल जोशी, सीमा घोगळे, केदार कुलकर्णी यांनीही अभिनय साकारला.
![]() |
| आशुतोष नाडकर्णी |
![]() |
| अभिनेत्री सीमा घोगळे यांच्यासोबत आशुतोष |
![]() |
| चित्रपटातील एका दृश्यात सहकलाकारांसोबत आशुतोष |
मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांची ‘भारतमातेस पत्ररूपी भेट’
गोगटे जोगळेकर
महाविद्यालयाच्या मराठी विभागाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतमातेस ‘पत्ररूपी’ अनोखी भेट दिली.
विद्यार्थी वर्ग
आजकाल पत्र लिहिण्यास विसरला असल्याने मराठी विभागाने विद्यार्थ्यांना प्रेरणा देत
पोस्ट कार्ड लिहिण्यास प्रवृत्त केले. ‘आईचे
पत्र हरवलं’, ‘डाकिया डाक लाया’ यासारखे खेळ आणि गाणी कालौघात लुप्त होत
चालल्याने पत्र लेखनाचा संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावा असा हेतू समोर ठेऊन सदर
उपक्रम घेण्यात आला. या पत्र लेखन स्पर्धेत कु. साक्षी पंडित प्रथम, ऋतुराज मराठे द्वितीय, शुभराणी होरंबे तृतीय क्रमांकाचे आणि
ओंकार ओक उत्तेजनार्थ विजेते ठरले. सर्व विजेत्यांना स्वातंत्र्यदिनी झालेल्या
समारंभात प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सर्व पत्रे फलकावर
प्रदर्शित करण्यात आली आणि नंतर शहीद जवान स्मारक, देवरुख,ता. संगमेश्वर येथे
प्रदर्शनास पाठवण्यात आली आहेत. या उपक्रमात अनेक विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने
सहभागी झाले होते. विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, डॉ. निधी पटवर्धन आणि प्रा. सायली पिलणकर यांनी या उपक्रमाकरिता
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Subscribe to:
Posts (Atom)
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...
-
पंडिती काव्याचे स्वरूप, विशेष आणि मर्यादा
-
सिगारेट नाटक (प्रिय रसिक मधील संदर्भ लेख)
-
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...







