Friday 25 February 2022

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात जीवन कौशल्य कार्यशाळा संपन्न

 


गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात जीवन कौशल्य कार्यशाळा संपन्न


रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे -जोगळेकर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने जीवन कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यशाळेत डॉ.अपर्णा महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाच्या कै.ज.शं.केळकर सभागृहात ही कार्यशाळा दिनांक २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या कालावधीत पार पडली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.प्रफुल्लदत्त कुलकर्णी, कलाशाखेचे उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई , मार्गदर्शक डॉ.अपर्णा महाजन, मराठी विभागप्रमुख प्रा.शिवराज गोपाळे उपस्थित होते.  कार्यक्रमाला शुभेच्छा देताना प्राचार्य डॉ.प्रफुल्लदत्त कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जीवन कौशल्ये अत्यंत आवश्यक आहेत. जीवन कौशल्ये आपल्याला अधिकाधिक विकसित करतात. मराठी विभाग प्रमुख प्रा.शिवराज गोपाळे यांनी मराठी विभाग नेहमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासानुवर्ती विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रास्ताविकात सांगितले. 

जीवन कौशल्य या तीन दिवसांच्या  कार्यशाळेत मार्गदर्शक डॉ.अपर्णा महाजन यांनी ध्येयनिश्चिती, लेखन कौशल्य, संवाद कौशल्य देहबोली, मुलाखत कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन तसेच निरंतर विकास कसा साधायचा अशा विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सीमा वीर यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय डॉ.निधी पटवर्धन यांनी करून दिला. सदर कार्यशाळेत सर्व शाखांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमास DMR Hydro या कंपनीने प्रायोजिकत्व दिले. फोटो पुढील दुव्यावर पाहता येतील.

https://drive.google.com/drive/folders/1r4UcqSA7aVFiYFTe_Ct4lmN2MBgz-k3A?usp=sharing






No comments:

Post a Comment

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

 गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त  दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...