मराठी वाङ्मय मंडळ उद्घाटन : २१ सप्टेंबर २०२२
प्रमुख अभ्यागत: लेखक अवधूत डोंगरे
गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात पुनर्रचित अभ्यासक्रमाची ऑनलाईन कार्यशाळा संपन्न
मराठी अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२२ रोजी आभासी माध्यमाद्वारे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण ८८ प्राध्यापकांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला. प्रथम वर्ष कला, अनिवार्य मराठी, पुनर्रचित अभ्यासक्रमाबाबत ही कार्यशाळा होती. उद्घाटनाच्या सत्राच्या प्रास्ताविकात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख शिवराज गोपाळे यांनी मराठी विभागाद्वारे झालेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. प्रास्ताविकानंतर मराठी अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ, अध्यक्ष डॉ. वंदना महाजन यांनी पुनर्रचित अभ्यासक्रम कार्यशाळेचे महत्त्व आणि भूमिका स्पष्ट केली. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या कला शाखेच्या उपप्रचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांना विषयाची गोडी लागण्यासाठी अध्ययन-अध्यापन सूत्रांची अशा पद्धतीच्या कार्यशाळा होणे ही आवश्यक बाब असल्याचे नमूद केले. उद्घाटन सत्राच्या समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष गोगटे -जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रफुल्ल दत्त कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात सत्राध्यक्ष डॉ. नीळकंठ शेरे यांनी प्रथम वर्ष, अनिवार्य मराठी, पुनर्रचित अभ्यासक्रम कार्यशाळेविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांना अध्यापन करताना या कार्यशाळा खूप उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. सदर सत्रात 'कथारंग' या कथासंग्रहाबाबत अध्ययन- अध्यापनाची सूत्र कशी असावीत हे सांगून कथासंग्रहाचा आशयात्मक व रचनात्मक अंगाने आढावा डॉ. विकास पाटील यांनी घेतला. 'काव्यरंग' या काव्यसंग्रहाबाबतचे अध्ययन- अध्यापन सूत्र डॉ. गोविंद काजरेकर यांनी स्पष्ट केले. कवितेचे अध्यापन करत असताना कविता संकल्पना विद्यार्थ्यांना कशी समजावून सांगावी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू डॉ. निधी पटवर्धन यांनी सांभाळली. आभार आणि सूत्रसंचालन प्रा. सीमा वीर यांनी केले.
प्रा. दु. का. संत (१९५१ ते १९५३)
*************************************************
डॉ. शरच्चंद्र घाटे ( २५ ऑक्टोबर १९६३ ते ३० एप्रिल १९९४)
**************************************************
****************************************************
****************************************************
**********************************************
गोगटे -
जोगळेकर महाविद्यालयात "मराठी राजभाषा दिन" उत्साहात संपन्न
मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे करण्यात आले होते. या दिनानिमित्त डॉ.वंदना बोकील -कुलकर्णी यांनी "काय वाचावे? कसे वाचावे?" या विषयावर आयोजित केलेल्या विशेष व्याख्यानात विद्यार्थ्यांनी पुस्तकाची निवड कशी करावी, कोणती पुस्तके वाचावी, ती कशा पद्धतीने वाचावी याविषयी मार्गदर्शन केले. "शब्दांत खूप मोठे सामर्थ्य आहे. वाचन करणे हा एका वेगळया अर्थाने आपल्याला संपन्न करणारा अनुभव आहे. म्हणून आपण आवर्जून पुस्तके वाचली पाहिजेत ", असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
या विशेष व्याख्यानाबरोबरच महाविद्यालयाच्या
मराठी विभागाने सहकार भित्तीपत्रकाचे आयोजन केले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रफुल्लदत्त
कुलकर्णी यांचा हस्ते या भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. सहकार
भित्तीपत्रकाबरोबरच मराठी तसेच विज्ञान विषयांवरील पुस्तकांचे प्रदर्शनही आयोजित
केले होते. या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी म्हणाले," आपण
सर्वांनी वाचनाची आवड जोपासली पाहिजे. वाचनाने आपल्याला समृद्धता प्राप्त होते.
वाचनाबरोबर लेखन कौशल्येदेखील विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजेत."
सदर कार्यक्रमांच्या प्रास्ताविकात
प्रा.शिवराज गोपाळे यांनी मराठी विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सहकार भित्तीपत्रक कार्यक्रमाच्या
अनावरण प्रसंगी मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या अभिवाचन स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या कु.आर्या
समीर वंडकर हिचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सीमा वीर
यांनी केले.
मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने संपन्न झालेल्या या कार्यक्रमांच्या प्रसंगी कला शाखेचे उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई ,सहकार वार्षिक अंकाचे संपादक डॉ.शाहू मधाळे, ग्रंथपाल किरण धांडोरे, डॉ.निधी पटवर्धन ,प्रा. शार्दुल रानडे, उत्पल वाकडे व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात जीवन कौशल्य कार्यशाळा संपन्न
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे -जोगळेकर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने जीवन कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत डॉ.अपर्णा महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या कै.ज.शं.केळकर सभागृहात ही कार्यशाळा दिनांक २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या कालावधीत पार पडली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.प्रफुल्लदत्त कुलकर्णी, कलाशाखेचे उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई , मार्गदर्शक डॉ.अपर्णा महाजन, मराठी विभागप्रमुख प्रा.शिवराज गोपाळे उपस्थित होते. कार्यक्रमाला शुभेच्छा देताना प्राचार्य डॉ.प्रफुल्लदत्त कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जीवन कौशल्ये अत्यंत आवश्यक आहेत. जीवन कौशल्ये आपल्याला अधिकाधिक विकसित करतात. मराठी विभाग प्रमुख प्रा.शिवराज गोपाळे यांनी मराठी विभाग नेहमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासानुवर्ती विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रास्ताविकात सांगितले.
जीवन कौशल्य या तीन दिवसांच्या कार्यशाळेत मार्गदर्शक डॉ.अपर्णा महाजन यांनी ध्येयनिश्चिती, लेखन कौशल्य, संवाद कौशल्य देहबोली, मुलाखत कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन तसेच निरंतर विकास कसा साधायचा अशा विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सीमा वीर यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय डॉ.निधी पटवर्धन यांनी करून दिला. सदर कार्यशाळेत सर्व शाखांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमास DMR Hydro या कंपनीने प्रायोजिकत्व दिले. फोटो पुढील दुव्यावर पाहता येतील.
https://drive.google.com/drive/folders/1r4UcqSA7aVFiYFTe_Ct4lmN2MBgz-k3A?usp=sharing
गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी
मराठी विभाग
आयोजित,
“Soft Skills Course”
‘जीवन कौशल्य कार्यशाळा’
'सॉफ्ट स्किल्स' हा शब्द आपण सतत
ऐकतो. अनेक सर्वेक्षण असे म्हणतात की पारंपरिक शिक्षणाबरोबरच नव्या जगात यशस्वी व्हायचं तर शैक्षणिक
गुणवत्तेबरोबर सॉफ्ट स्किल्स यायला हवीत! ती विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावीत या
उद्देशाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘जीवन कौशल्य कार्यशाळा’ घेणार आहोत.
साधनव्यक्ती - डॉ. अपर्णा महाजन, पुणे
नेमके काय शिकणार :
· Goal setting (ध्येयनिश्चिती)
· Writing skills- letters, email, resume
लेखन
कौशल्य पत्र (इ-पत्र व्यक्तिगत माहिती बायोडाटा)
·
Speech skills- body language, verbal non-verbal
communication, style संवाद कौशल्य देहबोली (भाषिक व अभाषिक
संज्ञापन शैली)
·
Interview skills (मुलाखत कौशल्य)
·
Time management (वेळेचे व्यवस्थापन)
·
Kaizen (उत्तमासाठी
बदल किंवा निरंतर विकास)
कालावधी : दि. २३, २४, २५ फेब्रुवारी २०२२ : सकाळी १० ते १२ (दोन तास)
शुल्क : ५० रुपये /- (अल्पोपहाराची सोय केलेली आहे)इच्छुक विद्यार्थ्यांनी मराठी विभागात दुपारी १२ ते १ या वेळेत संपर्क साधावा. आणि आपली नावे नोंदवावीत.
मराठी विभाग प्रमुख प्राचार्य
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...