Sunday, 28 June 2020
Friday, 28 February 2020
गो.जो.महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न
गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात दिनांक २७ फेब्रुवारी हा 'मराठी राजभाषा दिन'
मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ह.भ.प सायली विजय मुळ्ये या
विद्यार्थिनीचे 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' या
विषयावरील कीर्तन व ख्यातनाम दिग्दर्शक राजेंद्र बडे यांचे 'मराठी नाटक व चित्रपट
यांचा आस्वाद' यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
मराठी भाषा दिनाच्या या
कार्यक्रमासाठी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, ख्यातनाम
दिग्दर्शक राजेंद्र बडे, मराठी विभाग प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे , इतिहास विभाग
प्रमुख व ज्येष्ठ प्राध्यापक आर.एच. कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या
प्रास्ताविकात प्रा.गोपाळे यांनी मराठी विभागाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
यानंतर प्राचार्यांनी मराठी भाषेचे अलौकिकत्व कसे जपावे,भाषेचे जतन व
संवर्धनाकरिता कोणते प्रयत्न करावेत यासंबंधी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या
प्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु
असलेल्या उजळणी वर्गातील प्राध्यापक देखील उपस्थित होते. सहभागी प्राध्यापक वर्गातील
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, इस्लामपूर,जि.सांगली येथील प्रा. अमोल
पुंडलिक चांदेकर यांनी महाराष्ट्र गीत सादर केले.
या कार्यक्रमाच्या
निमित्ताने आयोजित केलेल्या कीर्तनात पूर्वरंगात सायली हिने मराठी भाषेची उत्पत्ती
कशी झाली यावर भाष्य केले. 'आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने'
यावर निरुपण सादर करून आद्य आत्मचरित्रकार, कीर्तन परंपरेचे प्रवर्तक नामदेवमहाराजांवरील
आख्यान सादर केले. नाटक व चित्रपट माध्यमांचा आस्वाद कसा घ्यावा याचे उपस्थितांना
मार्गदर्शन करताना राजेंद्र बडे यांनी आवर्जून नमूद केले की 'स्वतःच्या अनुभवातून,
प्रेरणांतून जी कलाकृती तयार होते तिच्यामुळेच प्रेक्षकांना समाधान देता येते.
चित्रपटांमध्ये शब्दांच्या भाषेपेक्षा 'चित्रभाषा' आनंददायक
असते. ती समजून घेता आली पाहिजे.'
मराठी विभागाने या
निमित्ताने 'माझा मराठाचि बोलू कवतुके' या विषयावर भित्तीपत्रक व मराठी भाषेतील विविध
ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या दरम्यान लेखन नैपुण्य
प्राप्त केलेल्या श्रद्धा हळदणकर या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग,
विद्यार्थी बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Thursday, 27 February 2020
Tuesday, 25 February 2020
Monday, 3 February 2020
राज्यस्तरीय ललित लेखन स्पर्धेत तेजस खरे प्रथम
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र प्रदेश आयोजित १८ व्या प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलनात तेजस खरे या विद्यार्थ्यास ललित लेखन साहित्य प्रकारात प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यनगरी, महाराजा अग्रेसन फौंडेशन, जालना येथे दि. १ व २ फेब्रुवारी २०२० रोजी १८ व्या प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये द्वितीय वर्ष वाणिज्य या वर्गातील विद्यार्थी तेजस नारायण खरे हा मराठी वाङ्मय मंडळातर्फे सहभागी झाला होता. त्याने ललित लेखन साहित्य प्रकारात प्रथम पारितोषिक पटकाविले. या स्पर्धेचे परीक्षण स्वाती दामोदरे यांनी केले. तर पारितोषिक वितरणाप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार रवींद्र गोळे उपस्थित होते. प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन तेजस खरे यास गौरविण्यात आले.

Subscribe to:
Posts (Atom)
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...
-
पंडिती काव्याचे स्वरूप, विशेष आणि मर्यादा
-
सिगारेट नाटक (प्रिय रसिक मधील संदर्भ लेख)
-
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...