Thursday, 6 October 2022


                                        मराठी वाङ्मय मंडळ उद्घाटन : २१ सप्टेंबर २०२२ 

                                            प्रमुख अभ्यागत: लेखक अवधूत डोंगरे

 

 

गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात पुनर्रचित अभ्यासक्रमाची ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

  मराठी अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२२ रोजी आभासी माध्यमाद्वारे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण ८८ प्राध्यापकांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला. प्रथम वर्ष कला, अनिवार्य मराठी, पुनर्रचित अभ्यासक्रमाबाबत ही कार्यशाळा होती. उद्घाटनाच्या सत्राच्या प्रास्ताविकात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख शिवराज गोपाळे यांनी मराठी विभागाद्वारे झालेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. प्रास्ताविकानंतर मराठी अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ, अध्यक्ष डॉ. वंदना महाजन यांनी पुनर्रचित अभ्यासक्रम कार्यशाळेचे महत्त्व आणि भूमिका स्पष्ट केली. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या कला शाखेच्या उपप्रचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांना विषयाची गोडी लागण्यासाठी अध्ययन-अध्यापन सूत्रांची अशा पद्धतीच्या कार्यशाळा होणे ही आवश्यक बाब असल्याचे नमूद केले. उद्घाटन सत्राच्या समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष गोगटे -जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रफुल्ल दत्त कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.

       कार्यशाळेच्या प्रथम सत्रात सत्राध्यक्ष डॉ. नीळकंठ शेरे यांनी प्रथम वर्ष, अनिवार्य मराठी, पुनर्रचित अभ्यासक्रम कार्यशाळेविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांना अध्यापन करताना या कार्यशाळा खूप उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. सदर सत्रात 'कथारंग' या कथासंग्रहाबाबत अध्ययन- अध्यापनाची सूत्र कशी असावीत हे सांगून कथासंग्रहाचा आशयात्मक व रचनात्मक अंगाने आढावा डॉ. विकास पाटील यांनी घेतला. 'काव्यरंग' या काव्यसंग्रहाबाबतचे अध्ययन- अध्यापन सूत्र डॉ. गोविंद काजरेकर यांनी स्पष्ट केले. कवितेचे अध्यापन करत असताना कविता संकल्पना विद्यार्थ्यांना कशी समजावून सांगावी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू डॉ. निधी पटवर्धन यांनी सांभाळली. आभार आणि सूत्रसंचालन प्रा. सीमा वीर यांनी केले.

 

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

 गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त  दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...