तेजस प्रकाशन, कोल्हापूर यांनी
आपल्या आनंद ब्लॉगसाठी कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या कथालेखन स्पर्धेत
मराठी विभागातील तृतीय वर्षात शिकणारी विद्यार्थिनी पूर्वा प्रशांत देवस्थळी हिने
द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
पूर्वा
देवस्थळी हिची 'अस्तित्व' ही कथा द्वितीय क्रमांकासाठी पात्र ठरली असून त्याकरिता ५०० रुपयांचे
पारितोषिक प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे आयोजक संस्थेच्या ब्लॉगवर ही कथा ऑनलाईन
प्रकाशित करण्यात आली आहे. आपणही ही कथा 'अस्तित्व' या दुव्यावर टिचकी देऊन वाचू शकता.Thursday, 14 November 2019
'मनाचे श्लोक' या विषयावर श्री. ओंकार मुळ्ये यांचे व्याख्यान संपन्न
मराठी विभागात पदव्युत्तर
अभ्यासक्रमाअंतर्गत अभ्यासपत्रिका क्र. १२.२ : ''प्राचीन कालखंडाचा अभ्यास -
शिवकाळ'' याअंतर्गत 'मनाचे श्लोक' या विषयावर श्री. ओंकार मुळ्ये यांचे व्याख्यान
दि. २३ ऑक्टोबर २०१९ रोजी संपन्न झाले.
श्री.
ओंकार मुळ्ये हे विभागाचे माजी विद्यार्थी असून शहरातील पटवर्धन हायस्कूल येथे
ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे उत्तम प्रवचनकार म्हणूनही त्यांचा
लौकिक आहे. श्री. मुळ्ये यांचे डॉ. निधी पटवर्धन यांनी विभागाच्या वतीने भेटवस्तू
देऊन स्वागत केले. श्री. मुळ्ये यांनी 'मनाचे श्लोक' या विषयावर रसाळ विवेचन केले.
मनाच्या श्लोकांची जन्मकथा सांगितली. भुजंगप्रयात वृत्तातली श्लोकांची रचना,
त्यातल्या १२ मात्रांचे विश्लेषण, सरस्वतीची लुप्तता-उपासना, तिची गरज, समर्थांचा लोकान्त
व एकांत, नवविधा भक्ती प्रकार समजावून सांगितले. आजच्या काळात मनाच्या श्लोकांची आश्वासकता
सांगितलीत. ते वैचारिक मूल्य विद्यार्थ्यांत बिंबवले. याप्रसंगी पदव्युत्तर विभागातील
विद्यार्थी, प्रा. सायली पिलणकर आदी उपस्थित होते.
श्री. ओंकार मुळ्ये यांचे स्वागत करताना डॉ. निधी पटवर्धन |
श्री. मुळ्ये व उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापक |
Subscribe to:
Posts (Atom)
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...
-
पंडिती काव्याचे स्वरूप, विशेष आणि मर्यादा
-
सिगारेट नाटक (प्रिय रसिक मधील संदर्भ लेख)
-
भाषिक सापेक्षतावादाचा सिद्धांत