डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी विभागाने केशवसुत स्मारकाला भेट दिली. यामध्ये मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, प्रा. सायली पिलणकर, समाजशास्त्र विभागाचे प्रा. शिवाजी उकरंडे यांच्यासह महाविद्यालयाच्या विविध विभागांतील सुमारे 20 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी स्मारकातील ग्रंथालयात कवी केशवसुत, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे स्मारक परिसरात बांधण्यात आलेल्या पद्मश्री मधु मंगेश कर्णिक रंगमंचावर विद्यार्थ्यांनी कवी केशवसुतांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम सादर केला. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालगुंडचे मा. माधव अंकलगे आवर्जून उपस्थित होते. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक रंगमंचावर झालेला हा पहिलाच कार्यक्रम असल्याचे त्यांनी सहर्ष नमूद केले. यावेळी विद्यार्थ्यांनी कवी कुसुमाग्रजांचे घर, उभारण्यात आलेले काव्यदालन आणि ग्रंथालय पाहिले. तसेच कवी केशवसुतांच्या योगदानाचे स्मरण केले.
Wednesday, 4 April 2018
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन २०१६
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बाबुराव जोशी ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या ज. शं. केळकर सभागृहात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. रमेश कांबळे, मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, विशेष व्याख्याते म्हणून देवरुख येथील ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉ. सुरेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी होतकरू विद्यार्थी पुस्तकपेढी योजनेतून पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
Subscribe to:
Posts (Atom)
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...
-
पंडिती काव्याचे स्वरूप, विशेष आणि मर्यादा
-
सिगारेट नाटक (प्रिय रसिक मधील संदर्भ लेख)
-
भाषिक सापेक्षतावादाचा सिद्धांत