Thursday 9 March 2023

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा


 गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त  दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्त्री, भूमी आणि भाषा' या विषयावर ललित लेखिका रश्मी कशेळकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तर 'कथाकथन : सराव आणि सादरीकरण' या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव सुवर्णपदक विजेती साक्षी चाळके हिने विद्यार्थ्यांसमोर कथाकथन सादर केले.

मराठी विभाग प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे यांनी प्रास्ताविक करून मराठी विभाग भाषा संवर्धनासाठी आणि विद्यार्थीकेंद्री उपक्रमांसाठी कसा कार्यरत असतो हे सांगितले. बोली जिवंत राहिली पाहिजे, यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्नशील असावे. कोकणातील बोली समृद्ध होण्यासाठी जास्तीत जास्त साहित्य लिहिले गेले पाहिजे. जसे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलीतून लेखक लिहितात तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांनी स्वतःच्या बोलीत वास्तव जीवनात आलेले अनुभव साहित्यातून मांडले पाहिजेत. मराठी प्रमाण भाषेबरोबरच स्थानिक बोलींचे संवर्धन करणे गरजेचे आहे. बोली टिकली, तरच मराठी भाषा टिकेल. स्वतःच्या बोलीला कमी न समजता सार्वजनिक ठिकाणी अभिमानाने बोलली पाहिजे. असे प्रतिपादन ललित लेखिका रश्मी कशेळकर यांनी केले.

 गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दुसर्‍या दिवशी मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात कथाकथन स्पर्धेत दोनदा सुवर्णपदक प्राप्त झालेली विद्यार्थिनी साक्षी चाळके हिने 'सॅल्यूट' आणि 'श्रीनिवास पानसेचे अंगण' या दोन कथांचे सादरीकरण केले. तिला प्रकट मुलाखतीतून डॉ. निधी पटवर्धन यांनी बोलते केले. कथाकथन, अभिनय, वक्तृत्व, सूत्रसंचालन यातील सीमारेषा कशा धुसर असतात, कथांची निवड कशी महत्त्वाची ठरते आणि एक स्पर्धक म्हणून आपण खिलाडू कसे असले पाहिजे याविषयी साक्षीने विद्यार्थ्यांशी संवाद केला. 

डॉ. चित्रा गोस्वामी यांनी व्यक्त होणे गरजेचे असते. आंतरसंवाद  साधला की अभिव्यक्ती उत्तम होते. स्वतःचे छंद शोधा, लिहिते व्हा. असा संदेश  अध्यक्षीय भाषणात दिला. यावेळी भाषेचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सीमा वीर यांनी केले.

विशेष कार्यक्रम : कथाकथन - सराव आणि सादरीकरण

 मुंबई विद्यापीठ गोल्ड मेडल विजेती साक्षी चाळके हिची प्रकट मुलाखत आणि कथाकथन सादरीकरण


मराठी भाषादिन : सजलेला विभाग आणि काव्य प्रदर्शन


 

मराठी भाषादिन २०२२-२०२३

 कविवर्य दादा मडकईकर यांचे व्याख्यान २७ फेब्रुवारी २०२३ 



 विभागातील मुलांनी सादर केलेले कार्यक्रम : 


Thursday 6 October 2022


                                        मराठी वाङ्मय मंडळ उद्घाटन : २१ सप्टेंबर २०२२ 

                                            प्रमुख अभ्यागत: लेखक अवधूत डोंगरे

 

 

गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात पुनर्रचित अभ्यासक्रमाची ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

  मराठी अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२२ रोजी आभासी माध्यमाद्वारे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण ८८ प्राध्यापकांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला. प्रथम वर्ष कला, अनिवार्य मराठी, पुनर्रचित अभ्यासक्रमाबाबत ही कार्यशाळा होती. उद्घाटनाच्या सत्राच्या प्रास्ताविकात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख शिवराज गोपाळे यांनी मराठी विभागाद्वारे झालेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. प्रास्ताविकानंतर मराठी अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ, अध्यक्ष डॉ. वंदना महाजन यांनी पुनर्रचित अभ्यासक्रम कार्यशाळेचे महत्त्व आणि भूमिका स्पष्ट केली. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या कला शाखेच्या उपप्रचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांना विषयाची गोडी लागण्यासाठी अध्ययन-अध्यापन सूत्रांची अशा पद्धतीच्या कार्यशाळा होणे ही आवश्यक बाब असल्याचे नमूद केले. उद्घाटन सत्राच्या समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष गोगटे -जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रफुल्ल दत्त कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.

       कार्यशाळेच्या प्रथम सत्रात सत्राध्यक्ष डॉ. नीळकंठ शेरे यांनी प्रथम वर्ष, अनिवार्य मराठी, पुनर्रचित अभ्यासक्रम कार्यशाळेविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांना अध्यापन करताना या कार्यशाळा खूप उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. सदर सत्रात 'कथारंग' या कथासंग्रहाबाबत अध्ययन- अध्यापनाची सूत्र कशी असावीत हे सांगून कथासंग्रहाचा आशयात्मक व रचनात्मक अंगाने आढावा डॉ. विकास पाटील यांनी घेतला. 'काव्यरंग' या काव्यसंग्रहाबाबतचे अध्ययन- अध्यापन सूत्र डॉ. गोविंद काजरेकर यांनी स्पष्ट केले. कवितेचे अध्यापन करत असताना कविता संकल्पना विद्यार्थ्यांना कशी समजावून सांगावी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू डॉ. निधी पटवर्धन यांनी सांभाळली. आभार आणि सूत्रसंचालन प्रा. सीमा वीर यांनी केले.

 

Wednesday 14 September 2022

विशेष व्याख्यान: अभ्यागत शुभदा चौकर 

विषय :प्रसारमाध्यमातील संधी  दिनांक : १५.०९.२२ 




मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

 गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त  दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...